दहिगाव येथे आदर्श विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

yawalnirop

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन सुरेश देवराम पाटील होते.

आपल्या पुढील शैक्षणीक भवितव्याबाबत विद्यार्थ्यांनी अचुक व योग्य निर्णय घ्यावा व योग्य दिशेने आपल्या भविष्याची पुढील वाटचाल करावी , प्रत्येक विद्याथ्र्र्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देऊन विशिष्ट प्रवीण मिळवावे व आपल्या शाळेचे गुरूजनांचे नाव लौकिक करावे या त्यासोबतच गावाचे नाव सुद्धा लौकिक करावे पहिला पुढील शैक्षणीक परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस मी देईल, असे प्रतिपादन सुरेश देवराम पाटील यांनी याप्रसंगी केले.

यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारून त्यांना बक्षीसही देण्यात आलीत. आपल्या गावातील प्रथम शिक्षण घेणाऱ्या शाळेची सदैव आठवण राहावी म्हणून शाळेला सर्व विद्यार्थ्यांंच्या वतीने सरस्वतीची प्रतिमा,दीप प्रज्वलनासाठी पंचारती तसेच घड्याळ असे भेट देण्यात आले. त्यामुळे भावनिक झालेल्या वातावरणात विद्यार्थ्यांप्रमाणेच गुरुजनांनाही अश्रू आवरता आले नाहीत.

याप्रसंगी संस्थेचे संचालक राजाराम महाजन मुख्याध्यापक शालिग्राम चौधरी, पर्यवेक्षक जी एस पाटील, माजी पंचायत समिती सदस्य मीना राजु तडवी, यांचेसह मान्यवर तसेच सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय पाटील यांनी तर प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले. मार्गदर्शनात गुरुजनांनी विद्यार्थ्यांना अनेक आठवणी सांगितल्या व भविष्याबाबत मार्गदर्शनही केले. आभार प्रदर्शन श्री.अहिरे यांनी केले.

Protected Content