बोंबला : चिखल उडाल्यावरून दोन गटात तुफान राडा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरात एकाच्या अंगावर चिखल उडाल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली असून यातून दोन्ही गटांमधील बारा जणां विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरातील चोपडा रोड वरील मोमीन वाड्यात दोन व तीन ऑगस्ट रोजी सलग दोन दिवस अंगावर चिखल उडण्याच्या कारणा वरून एकाच समाजातील दोन गटात आज तुफान राडा झाला. किरकोळ भांडणाला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाल्याने पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी कडक बंदोबस्त लावल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेत दोन्ही बाजूने सात जण जखमी झाले असून यावल येथून यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी जळगाव सिव्हिल हॉस्पिटल पाठविण्यात आले आहे. तर या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे

यातील पहिली फिर्याद ही शेख फारुक शेख यांनी दिली आहे. यानुसार, त्यांचा नातेवाईक शेख शोएब शेख शकील यांच्या अंगावर शेख शोएब शेख असलम यांनी चिखलाचे शिंतोळे उडवले. या कारणावरून आरोपींना राग आल्याने २ऑगस्ट रोजी चोपडा रोड यावल शहरात संध्याकाळी सात वाजता व सकाळी ३ऑगस्ट गुरूवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता कुरेशी मांडेवाला यांच्या दुकानासमोर सार्वजनिक ठिकाणी दोघा गटांमध्ये भांडण झाले. यात संशयित आरोपी शेख अख्तर शेख करीम ,शेख अरशद शेख करीम, शेख असलम शेख करीम, शेख शोएब शेख अस्लम शेख ,अफजल शेख करीम, शेख अफसर शेख करीम यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून हातात लोखंडी रॉड घेऊन आरोपी अख्तर शेख करीम याने फिर्यादी यांचे हातातील लोखंडी रॉडने निसार शेख हमीद याचे डोक्यात रॉड मारला. तसेच शेख अस्लम शेख हमीद मुका याचे उजव्या हातावर आरोपी शेख शोएब शेख असलम यांनी लोखंडी रॉड ने मारून दुखापत केली आरोपी त्यांनी व फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांना लाठ्या गाठ्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली.

या वेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेले नातेवाईक व येथील रहिवासी शेख अल्ताफ शेख फारूक, शेख निसार शेख हमीद ,शेख असलम शेख हमीद ,शेख सोनू शेख निसार ,शे शोएब शेख शकील तसेच समोरच्या मंडळी मधील शेख अफजल शेख करीम, शेख शमीम शेख हर्षद हे या हल्ल्यात सात गंभीर जखमी झालेले आहेत. यातील जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात मध्ये पाठवण्यात आले आहे.

यातील आरोपींविरुद्ध शेख फारूक शेख युसुफ यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशन मध्ये विविध कलामन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण तपास करीत आहे.

दरम्यान, तर दुसर्‍या फिर्यादीत सहा आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अर्शद करीम यांच्या फिर्यादी वरून पेरहनच्या मिरवणुकीत मध्ये नाचण्याच्या वेळी अंगावर चिखल उडाल्यामुळे शेख निसार शेख हमीद, गुड्डू शेख निसार ,शेख शोएब शेख शकील ,सोनू शेख निसार , फारूक शेख ,इरफान शेख यांच्याशी भांडण झाल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचाही तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण हे करीत आहेत.

Protected Content