भरधाव कारच्या धडकेत महिला जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी समोर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीक्षा किशोर बुवा (वय-२०) रा. खंडेराव नगर ,गणपती मंदीराजवळ, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २३ मे रोजी सकाळी ७.३० वाजता त्या दुचाकीने शिव कॉलनी स्टॉप समोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून (एमएच १९ डीएस ११९४) या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दीक्षा बुवा ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने  खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारानंतर शनिवारी २८ मे रोजी रात्री ११ वाजता चारचाकी वाहनधारकावर (नाव गाव माहित नाही) याच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत पाठक करीत आहे.

 

Protected Content