विप्रो कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कुटुंबियांसाठी दिला राजीनामा

neemuchwala

मुंबई वृत्तसंस्था । माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आबिदअली नीमचवाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कौटुंबिक कारणास्तव आबिदअली नीमचवाला यांनी राजीनामा दिला असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. आबिदअली नीमचवाला यांनी राजीनामा दिल्याचे पडसाद विप्रोच्या शेअरवर उमटले विप्रोचा शेअर 2 टक्क्यांनी घसरला. वाढती स्पर्धा आणि टार्गेट यांमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची दगदग वाढली आहे.

एप्रिल २०१५ मध्ये नीमचवला यांनी विप्रोमध्ये समूह अध्यक्ष आणि सीओओ म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी ते ‘टीसीएस’मध्ये २३ वर्षे होते. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांना बढती मिळाली आणि ते विप्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. ३१ जानेवारी २०२१ रोजी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. मात्र त्याआधीच त्यांनी कौटुंबिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला. यामुळं विप्रोच्या संचालक मंडळाने नव्या ‘सीईओ’ची निवड प्रक्रिया सुरु केली आहे. तोपर्यंत तात्पुरता पदभार त्यांच्याकडेच राहणार आहे.

शेअर बाजारासाठी ‘या’ घोषणा होणार
गेल्या चार वर्षात आबिदअली यांनी विप्रोत मोठे योदान दिले. नवी अधिग्रहणे आणि डिजिटल व्यवसाय वाढवणायत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. कंपनीचा पाया भक्कम करण्यात नीमचवाला यांचे नेतृत्व निर्णायक ठरले अशा शब्दात विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी नीमचवाला यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाढती स्पर्धा आणि टार्गेट यांमुळे काॅर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची दगदग वाढली आहे. विशेषत: आयटी सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.

कुटुंबासाठी कोट्यवधींच्या नोकरीला मारली लाथ
आयआयटी मुंबईमधून उच्च शिक्षण घेतलेले आबिदअली नीमचवाला हे मध्यप्रदेशातील नीमच जिल्ह्याचे आहेत. पत्नी आणि तीन मुले असा त्यांचा परिवार आहे. कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी नीमचवाला यांनी राजीनामा दिला आहे. २०१९ मध्ये त्यांना विप्रोतून २७ कोटींचे वेतन मिळले होते. यात ४१ टक्क्यांची वाढ झाली होती. इतर आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत नीमचवाला यांना घसघशीत वेतन मिळत होते.

Protected Content