Home क्राईम वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूची चोरटी वाहतूक; ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
43

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

निमखेडी शिवारातून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता सुमारास निमखेडी शिवार ते चंदू अण्णा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर  वाळूची चोरटी वाहतूक करणारे विना क्रमाकांचे ट्रॅक्टर पकडले. चालकाकडे वाळू वाहतुकीबाबत कुठलाही परवाना नसल्याने पोलिसांनी एक ब्रॉस वाळूसह ट्र्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल दीपक कुमार फुलचंद शिंदे  यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात ट्रॅक्टरवरील चालक प्रमोद भिकन सपकाळे वय २४ रा. कूवारखेडा ता. जळगाव यांच्याविरोधात गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील  हे करीत आहेत.


Protected Content

Play sound