विखे-पाटलांचा सत्यजीत तांबे यांना पाठींबा

नगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानपरिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत तांबे यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठींबा जाहीर केला आहे.

विधानपरिषदेसाठी उद्या मतदान होत असतांना आता अंतर्गत मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे. रूढ अर्थाने प्रचार संपला असला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपापल्या उमेदवारांना पाठींबा देण्याची चढाओढ सुरू झालेली आहे. यातच अतिशय निर्णायक अशा शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला पाठींबा जाहीर केला आहे.

आज या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, माझ्यासह सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांना पाठींबा दिला असून हा वैयक्तीक असून पक्षीय पातळीवरचा नाही. विखे पाटील आणि थोरात घराण्यातील वैर सर्वश्रुत असतांना थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांना त्यांनी दिलेला पाठींबा लक्षणीय मानला जात आहे. यामुळे अर्थातच त्यांचा लाभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content