दोन महिन्यांपासून फरार संशयितांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औरंगाबाद जिल्ह्यात गुन्हा करून दोन महिन्यांपासून महिन्यापासून फरार असलेल्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी २८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव शहरातील प्रजापत नगरातून अटक केली आहे. दोघांनी गुन्ह्यातील कबुली दिली असून औरंगाबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३७९/२०२२ प्रमाणे संशयित आरोपी अजय लीलाधर गोसावी रा. प्रजापत नगर, जळगाव व त्याचा साथीदार मनोज उर्फ मयूर शालिक चौधरी रा. तुकारामवाडी जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेजण पोलीसांच्या हातात तुरी देवून दोन महिन्यांपासून फरार झाले होते. दरम्यान जळगाव स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन्ही संशयित आरोपी हे प्रजापत नगरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, पोलीस नाईक विजय पाटील, परेश महाजन यांनी कारवाई करत संशयित आरोपी अजय गोसावी व मनोज उर्फ मयूर चौधरी यांना शनिवारी २८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता प्रजापत नगरातून अटक केली. पुढील कारवाईसाठी त्यांना या औरंगाबाद सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोघे संशयित आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Protected Content