Home क्राईम शेतातील केळीचे ३०० घड कापून नुकसान; यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल

शेतातील केळीचे ३०० घड कापून नुकसान; यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल

0
107


यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोळवद शिवारातील शेतातून एकाने ३०० केळी घड कापून नुकसान केले आहे. याप्रकरणी मंगळवार, २९ मार्च रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ‘यशवंत टोपा महाजन रा. कोळवद ता. यावल ह. मु. भुसावळ यांचे यावल तालुक्यातील कोळवद शिवारात शेत गट नंबर ७८ मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतात त्यांनी ३०० केळीचे खोडाचे बागा तयार केलेले आहे.

दि.२८ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास उद्धव टोपा महाजन रा.समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज समोर, जळगाव याने त्यांच्या शेतातील ३०० केळीचे खोडसह कापणीवर आलेले केळी कापून १ लाख रुपयांचे नुकसान केले आहे.’

याप्रकरणी यशवंत महाजन यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित आरोपी उद्धव महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून २९ मार्च रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र पवार करत आहे.


Protected Content

Play sound