जाणून घ्या; – मराठी साहित्य संमेलन किती कोटींचे ?

नाशिक लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक येथे डिसेंबरमध्ये संपन्न झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या हिशोबाची बैठक स्वागताध्यक्ष तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘भुजबळ फार्म’वर संपन्न झाली.

याप्रसंगी लोकहितवादी महामंडळाचे पदाधिकारी तसेच विविध समित्यांचे प्रतिनिधी हजर होते. सुरुवातीला बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, “संमेलनासाठी आलेल्या एकूण ३ कोटी ५७ लाख ४५ हजार ५९४ निधीपैकी या संमेलनाचा एकूण खर्च ३ कोटी ४४ लाख २८ हजार ९४८ इतका झाला असून १३ लाख १६ हजार रुपये शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content