वाणेगाव येथील पोलीस पाटलांनी केला घरोघरी जावून महिलांचा सन्मान

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील वाणेगाव येथील पोलीस पाटील नितीन जमदाडे यांनी महिलांचा घरोघरी जावून सन्मान केला आहे. 

यावेळी पोलिस पाटील यांनी विद्यमान नवनिर्वाचित महिला सरपंच मनिषा दिलीप पाटील, उपसरपंच जिजाबाई रमेश संसारे, महिला सदस्य ज्योती पतिंग पाटील, वर्षा चंदू पाटील, स्वस्त धान्य दुकानाचे निर्मला गुलाब पाटील, या सर्वांच्या घरी जाऊन शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सोशल डिस्टंसिंगचे पालन करून, मास्क लावुन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जि. प. प्राथमिक शाळा वाणेगांव, येथील शिक्षिका पल्लवी पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी वाणेगांवचे पोलीस पाटील नितीन जमदाडे, प्रकाश पाटील, भुषण पाटील, दिपक पाटील, अरविंद पाटील, बंडू नाना पाटील, गोपाल पाटील मुख्याध्यापक रविंद्र शिंदे, गुलाब पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

<p>Protected Content</p>