रामनगरातून चार मोबाईल लंपास; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । मध्यरात्री घरात सर्वजण झोपले असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चार मोबाईल लंपास केल्याची घटना मेहरूणमधील रामनगरात शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी आज सोमवारी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून माहिती अशी की, शैलेस हिरालाल लुंकड (वय-२५) रा. रामनगर, मेहरूण हे आईवडीलांसह राहातात. १५ मे रोजी रात्री १० वाजता जेवण करून वरच्या गच्चीवर आई-वडील व आजोबांसह झोपायला गेले. त्यावेळी सर्वांचे मोबाईल झोपण्याच्या उशीखाली ठेवण्यात आले होते. अज्ञात चोरट्यांनी सर्वजण झोपले असल्याचा फायदा घेतल १८ हजार रूपये किंमतीचे चार मोबाईल चोरून नेल्याचे पहाटे नळाला पाणीभरण्यासाठी उठल्यावर समजले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.कॉ. सचिन पाटील करीत आहे.

Protected Content