जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वर्सी महोत्सवानिमित्त गणपती नगरात संतगुरू साई सतरामदास साहेबजी यांच्या ११३ व्या पुण्यतिनीनिमित्त रविवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणपती नगरात असलेल्या सिंधी समाज बांधव आणि परिवाराच्या वतीने संतगुरू साई सतरामदास साहेबजी यांच्या ११३व्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय वर्सी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. रविवारी २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता समाज बांधवांनी भव्य शोभायात्रा काढली. यावेळी सर्व भाविक भक्त आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी ६ वाजता भव्ययाात्रा संपल्यानंतर रात्री ९ वाजता विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान हा वर्सी महोत्सव २२ ते २४ जानेवारी असे तीन दिवस चालणार असून तिनही दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दररोज रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत भाविकांसाठी आम भंडाराचे दखेील आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती सिंधी समाज बांधवांच्य वतीने करण्यात आले आहे.