डॉक्टर , शेतकरी आधुनिक काळातील देवदूत — रोहिणी खडसे (व्हिडिओ)

 

कुऱ्हा काकोडा ( मुक्ताईनगर) : प्रतिनिधी । डॉक्टर , शेतकरी  आधुनिक काळातील देवदूत असल्याचे प्रतिपादन आज जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे – खेवलकर यांनी केले

 

रोहिणी  खडसे म्हणाल्या माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजेच किसान दिन तसेच बंगालचे दिवंगत मुख्यमंत्री डॉ बि सी राय यांची जयंती म्हणजेच डॉक्टर दिन त्यानिमित्ताने आज आपण परिसरातील प्रगतशील शेतकरी बांधवांचा आणि डॉक्टर बंधूंचा सत्कार करत आहोत  दिड वर्षांपासून कोरोना काळात सर्व उद्योग धंदे बंद असताना आपण सर्व घरात असताना शेतकरी बांधव आणि डॉक्टर बांधवांनी सेवा बजावली आपण कोविड काळातील देवदूतच आहात भविष्यात कोविडचे हे संकट गडद होण्याची शक्यता असून येत्या काळातसुद्धा आपण आपली सेवा समर्पण देऊन  महाराष्ट्र कोरोना मुक्त होण्यासाठी मदत करावी कोविड काळात शेतकरीसुद्धा अविरत शेतात कष्ट घेत होते त्यामुळे लॉकडाऊन काळात सर्व बंद असताना अन्न धान्याचे उत्पादन सुरू होते आपल्याला नियमित रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या भाजीपाला आणि दुध उपलब्ध होत होते या जनसेवेसाठी शेतकरी सहपरिवार शेतात राबत होता आणि सर्व जगाचे पोट भरत होता असेही त्या म्हणाल्या

 

सुप्रियाताई सुळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचा संसदरत्न म्हणून गौरव झाला आहे त्यांनी स्त्री भ्रूणहत्या विरोधात मोठे कार्य केले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून सामान्य घरातील युवतींना राजकीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे यातून नवीन स्त्री नेतृत्वाचा उदय होईल , असेही त्या म्हणाल्या

 

 

कुऱ्हा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक आणि डॉ बि सी राय यांच्या जयंती निमित्त तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गायत्री मंदिर परिसर,प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, बाजार समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले परिसरातील प्रगतिशील शेतकरी आणि कोविड काळात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा , आणि कुऱ्हा कोविड केअर सेंटर ला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या  पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

यावेळी  बाजार समिती सभापती निवृत्ती  पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यु डी पाटील, जि प सदस्य निलेश पाटील, माजी सभापती दशरथ  कांडेलकर, प्रदिप साळुंखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शाहिद खान, सरचिटणीस रविंद्र दांडगे, रमेश खंडेलवाल, शिवा पाटील, रवी पाटील , राजु खंडेलवाल, ओमप्रकाश चौधरी, रणजित गोयनका, मनोहर निंबाळकर, प्रभुसिंग बडगे, गजानन पाटील , भुषण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती

 

जिल्हा अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील म्हणाले स्व वसंतराव नाईक अकरा वर्ष मुख्यमंत्री राहिले या अकरा वर्षात त्यांनी समाजातील उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याचे आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून  कार्य केले त्यांनी आणलेल्या संकरित बियाण्यामुळे हरित क्रांती घडली  डॉ बि सी राय हे बंगालचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी आपली रुग्णसेवा सुरू ठेवली होती दोघांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊन आपले सामाजिक योगदान द्यायला हवे

 

 

यावेळी गोपाळ पाटील, छगन राठोड, राजेश ढोले, प्रविण दामोदरे , मुन्ना बोडे, अनंत पाटील, विवेक पाटील, संतोष पाटील , कान्हा चौधरी , पवन पाटील ,  राजू बोरसे , योगेश बोराखेडे, अविनाश पहाडे, देविदास पाटील,  किरण नेमाडे  , पवन पाटील , अजय पाटील , सागर काकडे , पवन मस्के, शुभम खंडेलवाल, सोनू इरफान मिस्त्री ,  शंकर  मोरे , रुपेश माहुरकर , मनोज गोरले ,  सूरज गव्हाळे, हरी भोई , अतुल ठाकूर, बबलू भिसे , कमलेश बडूगे,  पवन म्हस्के, आशिष हिरोळे, दीपक पाटील, विठ्ठल पाटील, विशाल वानखेडे , बाळू साठे , निखिल मालगे, छोटू  गव्हाळे , भैया पवार , भूषण सोनवणे, गणेश भोलाणकर ,  नितेश राठोड,  भैया कांडेलकर  , सुशील भुते , मयुर साठे उपस्थित होते

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/2584493338351829

 

Protected Content