अनिल महाजन यांनी घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे ओ.बी.सी. नेते तथा ए. एम. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन यांनी आज राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मंत्रालयात भेट घेतली. 

यावेळी अनिल महाजन यांनी जळगाव जिल्ह्याच्या योजना बाबत व नवीन प्रकल्प जिल्ह्यात आणावे याबाबत चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे अनिल महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

 

Protected Content