तरूणीच्या हातातील मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल क्रेझी कॉटेज समोरून अज्ञात दोन जणांनी तरूणीच्या हातातील महागडा मोबाईल जबरी हिसकावून लांबविल्याची घटना गुरूवार १९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती सोमनाथ शिरसाठ (वय-२८) रा. तांबापुरा, जळगाव ही तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. गुरुवार १९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तरूणी ही हॉटेल क्रेझी कॉटेजच्या समोर पायी जात असताना मागून अज्ञात दोन जणांनी येवून तिच्या हातातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पसार झाल्याचे घटना घडली. तरुणीने आरडा ओरड केली, परंतु तोपर्यंत अज्ञात चोरटे मोबाईल घेऊन पसार झाले होते. ही घटना घडल्यानंतर तरुणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.

Protected Content