Home क्राईम कोल्हे शाळेजवळून एकाची दुचाकी लांबविली

कोल्हे शाळेजवळून एकाची दुचाकी लांबविली

0
60

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या गेट समोरून एकाची १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुरूवार १९ जानेवारी रेाजी सकाळी १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील जगन्नाथ पाटील (वय-४७, रा. समर्थ कॉलनी, जुना असोदा रोड, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ते त्यांच्या दुचाकी (एमएच १९ सीटी २४०२) ने जळगाव शहरातील काशीबाई उखाजी शाळेजवळ आले. त्यांनी शाळेसमोरील गेटजवळ त्यांची दुचाकी पार्किंगला लावली व खाजगी कामासाठी निघून गेले. दरम्यान अवघ्या अर्धा तासांमध्ये अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. काम आटोपून ते परत आल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी मिळून आली नाही, दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु कुठेही काहीही माहिती न मिळाल्याने अखेर गुरुवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय मराठे करीत आहे.


Protected Content

Play sound