लोहमार्ग पोलिसांच्या हजेरीचा झोल; निरिक्षक म्हणताय चौकशी सुरू ! ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । येथील लोहमार्ग पोलीस आपल्या वरिष्ठांना मॅनेज करून ड्युटीवरून दांडी मारत असल्याचा गंभीर प्रकार काही दिवसांपुर्वी उघडकीस आला असून आता याला दाबण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रकरणाला सात दिवस उलटून गेले तरी पोलीस निरिक्षक डंबाले यांनी चौकशी सुरूच असल्याचे सांगत सारवासारव केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.डॉक्टर,पोलीस, सफाई कर्मचारी दिवस-रात्र कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लढा देत आहे.तर भुसावळातील लोहमार्ग पोलीस ठाण्याचे तब्बल नऊ कर्मचारी निरीक्षक व हजेरी मास्टरांच्या संगनमताने गैरहजर असून हजर दाखविले जाण्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी उघडकीस आला आहे. १८ मे रोजी पत्रकारांनी याचा गौप्यस्फोट केला. या संदर्भात लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर. सु. डंबाले यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, सर्व कर्मचारी हजेरी मास्टरांनी ड्युटी लावण्यात आलेल्या ठिकाणी ड्युटी करीत आहे. निरीक्षकांनी माहिती दिली की,ड्युटीवर असणार्‍या सर्व कर्मचार्‍यांचे दोन तासानंतर फोटो मागविले जातात व जे कर्मचारी आपले फोटो पाठवीत नाही त्यांच्याशी संपर्क साधला जातो.मग ९ कर्मचार्‍यांची माहिती देण्यास निरीक्षक दिनकर.सु. डंबाले असमर्थता का दाखवित आहे ? माहिती देण्यास का टाळाटाळ का करीत आहे.

या प्रकरणा संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने शहरातील अन्य पत्रकारांसोबत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनकर. सु.डंबाले यांच्याशी चर्चा केली काही ठिकाणी शहानिशा केली असता त्या ठिकाणी कर्मचारी गैरहजर असल्याने निर्दशनास आले आहे मात्र त्या कर्मचार्‍यांना हजर दाखविण्यात आले असल्याची माहिती ठाणे अंमलदार शिंदे यांनी दिली. तर हा झोल दडपण्याचा प्रयत्न निरीक्षक दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये बाहेर गावावरील येणार्‍या ९ कर्मचारी तसेच निरीक्षक व हजेरी मास्टरांच्या मोबाईलचे लोकेशन व मोबाईलचे कॉल डिटेल्सची संपूर्ण माहिती, ड्युटी करीत असतांनाचे फोटो वरिष्ठांनी मागविल्यास सत्यता समोर येण्याची शक्यता नाकारता येत आहे.

याबाबत लाईव्ह ट्रेंडस् न्यूजने लोहमार्ग पोलीस निरिक्षक दिनकर डंबाले यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ आधीच प्रसारित केला आहे. यात ते या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगत आहेत. तथापि, आता सात दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्या नंतरही चौकशी पूर्ण करण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत मोबाईलवर कॉल करून त्यांच्याशी संपर्क साधला असता डंबाले म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी अजून सुरू आहे. सात दिवसा नंतरही याची चौकशी पूर्ण न झाल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे आता दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवरून याची चौकशी करण्यात यावी असे साकडे घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही याबाबत निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे कळते.

पहा : लोहमार्ग पोलीस स्थानकाचे निरीक्षक दिनकर डंबाले संबंधीत प्रकरणाबाबत या आधी नेमके काय म्हणालेत ते !

https://www.facebook.com/508992935887325/videos/1107581352952334

Protected Content