Home क्राईम बाल सुधारगृहात आढळले दोन मुलांचे मृतदेह

बाल सुधारगृहात आढळले दोन मुलांचे मृतदेह

0
32

 

बुलडाणा । बुलडाणा येथील शासकीय बाल सुधारगृहात दोन मुलांचे मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

बुलढाणा शहरात चिखली रोडवर शासकीय मुलांचे निरीक्षण गृह/सुधारगृह आहे. त्या ठिकाणी दोन मुलांचे मृतदेह बंद खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेत. बाल सुधारगृहाच्या या खोलीत एकूण तीन मुलं होती, त्यातील दोघांचे मृतदेह आढळले असून तिसरा मुलगा सुरक्षित आहे. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, तहसीलदार खंडारे पोहोचले असून पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे.


Protected Content

Play sound