नाईक आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशीचे आदेश ; अर्णब गोस्वामीच्या अडचणी वाढल्या

मुंबई (वृत्तसंस्था) अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा सीआयडी मार्फत तपास होणार आहे. नाईक कुटुंबीयांनी केलेल्या विनंतीवरून या प्रकरणाचा फेरतपासणी करण्यात येणार असून सीआयडीकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. दरम्यान, रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमुख व संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

 

 

रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमुख व संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर काही दिवसांपूर्वी एक महिलेने आरोप केले होते. या संदर्भातील महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता. त्यानंतर, संबंधित महिलेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही तक्रार केली होती. त्यानंतर, गृहमंत्री देशमुख यांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग करत, ती फाईल रिओपन करण्याचे आदेश दिले आहेत. देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. ५९/२०१८, भादंवि ३०६,३४ प्रमाणे तसेच गु.र.नं. ११४/२०१८ भांदवि कलम ३०२ प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते.

Protected Content