गोलाणी मार्केटमधील कार्यालय फोडले; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व मार्केट दुकाने बंद आहे. गोलाणी मार्केटमधील बंदावस्थेत असलेले कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फाडून आतील साहित्य चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अज्ञात चोरट्यांनी लॉकडाऊन फायदा घेत गोलाणी व्यापारी संकुलातील दुसऱ्या मजल्यावर विजय सोनवणे यांच्या मालकीचे वैष्णवी असोसिएट या कार्यालयाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रेवश केला. आतील साहित्य चोरुन नेले आहे. शहर पोलिसांत या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आतील संगणक, सिपीयु , युपीएस आणि दोन मोबाईल असा ऐवज चोरुन नेला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पेलिसांनी धाव घेत पहाणी केली. विजय सोनवणे यांच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content