रावेर कोविड केअर सेंटरमध्ये निकृष्ट जेवण ; जिल्हाधिकारी भडकले

रावेर, प्रतिनिधी । आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी रावेर कोविड केअर सेंटरला भेट दिली असता. त्या ठिकाणी जेवणाचा दर्जा पाहून जिल्हाधिकारी चांगलेच भडकले.

जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी सावदा व रावेर येथे कोविड केअर सेंटरला भेट देवून पाहणी केली. रावेर कोविड केअर सेंटर येथे पाहणी करून निघत असतांना जेवण घेवून एक जण आला त्याच्यावर लक्ष जाताच जिल्हाधिकारी गाडीत न बसता पुन्हा कोविड सेंटर मध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी जेवण पाहिले व ते भडकले. पार्सल पन्नी व अल्प प्रमाणात जेवण असल्याचे दिसल्यावर त्यांनी खडेबोल सुनावले. १५० रूपये शासन देत असतांना त्या प्रमाणात जेवणाचा दर्जा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. जेवणासोबत प्लेट ही न होत्या. जेवणाची व्यवस्था महसूल विभागाकडून होत असतांना मुख्याधिकारी यांच्यावर जिल्हाधिकारी भडकल्यामुळे चर्चा रंगली. कापूस खरेदी केंद्र व सावदा येथे ही जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. कापूस व्यापा-यांनी मजूर हे मध्यप्रदेश मधून आणण्यासाठी पासची मागणी केली. त्यांना पास उपलब्ध करून देण्याविषयी संबंधितांना सूचना दिल्या.

Protected Content