लॉकडाऊनमध्ये कुठलीही विशेष ट्रेन धावणार नाही- रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली वृत्तसंस्था । लॉकडाऊनच्या कालावधीत कोणतीही ट्रेन धावणार नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत अफवा पसरवू नये असे देखील बजावले आहे.

काल विशेष रेल्वे धावणार असल्याच्या अफवेने बांद्रा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला होता. या पार्श्‍वभूमिवर रेल्वे मंत्रालयाने सध्या कोणतीही विशेष रेल्वे धावणार नसल्याचे एका ट्विटच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. यात म्हटले आहे की, ३ मे पर्यंत सर्व प्रवासी रेल्वे गाड्या आधीच रद्द करण्यात आल्या असून तोवर कोणत्याही प्रकारच्या विशेष ट्रेन्स चालविण्यात येणार नाहीत. या संदर्भात कुणीही अफवा पसरून नये असे देखील या ट्विटमध्ये बजावण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content