सुरळीत धान्य वाटपासाठी समित्या गठीत करा-बबलू बर्‍हाटे

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत रेशनचा धान्य पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी दुकान निहाय समित्या गठीत करण्याची मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीच्या काळात रेशनधान्य बाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. धान्य पुरवठा पारदर्शक व्हावा आणि सार्वजनिक वितरण प्रणालीवर नियंत्रण ठेवले जावे यासाठी दुकान निहाय समित्या गठित करण्यात याव्या अशी मागणी भुसावळचे तहसीलदार दीपक धिवरे यांच्याकडे शिवसेनेचे शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे यांनी केली आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भुसावळातील १२१ रेशन दुकानांमध्ये मोफत तांदूळ तसेच इतर धान्य वितरण सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तात्पुरती समिती गठीत करावी तसेच या समितीत प्रत्येक दुकान समितीत शिवसेनेच्या पदाधिकारी किंवा शिवसैनिकांची तात्पुरत्या नेमणूक करावी. या तात्पुरत्या समितीमुळे येणार्‍या तीन महिन्यांच्या धान्य वाटपात, सार्वजनिक वितरण प्रणालीवर अंकुश राहील, वितरण प्रणाली पारदर्शक होईल.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, यामुळे ग्राहकांच्या तक्रारीचा निपटारा होईल, याप्रमाणेच गाव पातळीवरही तक्रारी दूर होतील. रेशन दुकानातून होणारा धान्यपुरवठा खरोखरच गोरगरीब जनतेपर्यंत होतो, की नाही, हे पाहण्याची जबाबदारी या समितीची राहील. ई-पॉस मशीनवर वृद्ध, गोरगरीब जनतेचे ठसे उमटत नाहीत. तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचे लाभार्थ्यांमधून बोलले जात आहे, या तक्रारी लवकर सुटतील म्हणून ह्या वार्ड निहाय दुकान स्तरीय समित्या लवकर स्थापन कराव्यात अशी मागणी बबलू बर्‍हाटे यांनी केली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content