Home Cities धरणगाव जळगाव ग्रामीण मतदार संघात ग्रामस्थांनी उभारल्या भगव्या गुढ्या

जळगाव ग्रामीण मतदार संघात ग्रामस्थांनी उभारल्या भगव्या गुढ्या

0
104


Gulab patil news 1

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी घरांवर भगवी गुढी उभारली आहे. या भगव्या गुढ्यांमुळे महायुतीच्या उमेदवाराला पाठबळ दिले आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरावर भगव्या गुढ्या उभारल्यामुळे शिवसैनिकांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

धरणगाव तालुक्यातील एकलग्न, मुसळी, भोंद खु, चवलखेडा, हनुमंतखेडा, सतखेडा, अंजनविहिरे, खामखेडा, वाकटुकी, दहीदुल्ले, निंभोरा या गावांमध्ये हाऊस टू हाऊस जाऊन धनुष्यबाण मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवसेना भाजपा रिपाइं महायुतीचे तालुक्यातील पदाधिकारी, त्या-त्या गावातील कार्यकर्ते व शिवसैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound