अफगाणिस्तानाबद्दल चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारने अफगाणिस्तामधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ही बैठक होईल.

 

या बैठकीत तालिबानने सत्ता काबीज केलेल्या अफगाणिस्तानमध्ये घडलेल्या घडामोडींबाबत परराष्ट्र मंत्रालयाने राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती द्यावी, असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे.

 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांना माहिती का देत नाहीत, असा सवाल केला होता. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या हिंदू आणि शीख तसेच अफगाणी नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन भारतानं दिलंय.

 

अफगाणिस्तावर तालिबानने कब्जा केल्यानंतर बाकीचे देश तिथं अडकलेल्या नागरिकांना परत मायदेशी आणत आहेत. काही अफगाणी नागरिकांनादेखील आश्रय देण्यासाठी देशात आणलं जातंय. भारतीय वायूदलाने अफगाणिस्तानमधील संघर्षजन्य परिस्थितीत रविवारी १०७ भारतीयांसह १६८ जणांना काबूलमधून बाहेर काढून भारतात आणले. परराष्ट्र मंत्रालयाच्या अंदाजानुसार, ४०० भारतीय अद्यापही अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

 

भारत सरकारने अफगाणिस्तानातून परतलेल्यांना मोफत कोरोना, पोलिओ लस – ओपीव्ही आणि एफआयपीव्ही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलेल्या लोकांचं लसीकरण करण्यात आलंय, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

 

Protected Content