जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अब्दुल सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी तीव्र टीका केली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलतांना खासदार सुप्रीया सुळे यांच्याबाबत एक अतिशय आक्षेपार्ह टिपण्णी केली. संबंधीत पत्रकाराने सुप्रीयाताई या शिंदे गटावर पन्नास खोके घेतल्याचे आरोप करत आहेत. तुम्हाला देखील खोके मिळाले आहेत का ? असा प्रश्न विचारला. यावर अब्दुल सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रीया सुळे यांच्यावर टिका केली. यामुळे आता राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून याचे व्यापक पडसाद उमटणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी आमदार एकनाथराव खडसे यांनी सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, राजकारणात आरो-प्रत्या