Home राजकीय लवकरच अजित पवार मुख्यमंत्री होणार : संजय राऊत

लवकरच अजित पवार मुख्यमंत्री होणार : संजय राऊत

0
45

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्याच्या राजकारणातील बदलेल्या समीकरणानंतर लवकरच मुख्यमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे येणार असल्याचा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना राज्यातील बदललेल्या स्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता आमच्यासोबत आहे. आमच्यासोबतच राहील. जनता आम्हाला साथ देणारी आहे. भाजपने राजकीय पक्षांना फोडणं सुरू केलं आहे. महाराष्ट्रात अशी परंपरा कधीच नव्हती. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात असं कधीच झालं नाही. कॅमेर्‍यासमोर सांगतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलणार आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळले. एकनाथ शिंदे यांना हटवलं जाणार आहेत. जे चाललं आहे. १६ आमदार बाद होणार आहेत. त्यामुळे अजित पवार यांना गडबडीत घेतलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील असे राऊत म्हणाले.

 

याप्रसंगी संजय राऊत यांनी भाजप नेतृत्वावर देखील जोरदार टिका केली. ते म्हणाले की, देशात मोदी आणि शाहांमुळे आयाराम-गयाराम संस्कृती फोफावण्यासाठी वेग आलेला आहे. अजित पवार हे तुरूंगात खडी फोडणार असल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. याचे आता काय होणार असा प्रश्‍न देखील त्यांनी विचारला आहे.


Protected Content

Play sound