हजारो भाविकांच्या जयघोषाने दुमदुमली व्यास नगरी !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महर्षी व्यास यांच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या यावलमध्ये आज गुरूपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.

 

गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने सोमवारी प्रसिद्ध असलेल्या महर्षीव्यासमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . मंदीरात आज सकाळपासुन दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.

महर्षी व्यास गुरूंच्या अग्रस्थानी आहेतमहर्षीव्यासांना भारतीय संस्कृतीतील अद्भुत रहस्य मानले जाते असे म्हणतात की  व्यासोच्छीट जगत सर्व  ! ( अर्थात या पृथ्वीतलावरील कोणत्याही ज्ञानाची जाणीव सर्वप्रथममहर्षीव्यासांना होते. ) महर्षी व्यास हे गुरूंचे  प्रतिनिधी   आहेत. त्यामुळेमहर्षीव्यासांना गुरु परंपरेत श्रेष्ठ स्थान आहे. चार वेद ,अठरा पुराण व  महाभारत रचयीते  महर्षी   व्यासांचे   येथे भव्य मंदिर आहे. दरवर्षी गुरु पौर्णिमेस मोठा उत्सव साजरा करण्यात येतो.तसेच परीसरात  यात्रेचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने यंदा देखील यात्रा भरली असून या निमित्ताने मंदिर व परीसरात रोषणाई करण्यात आली आहे.

 

आख्यायिका

 

महर्षीव्यासांनी यावलला काही काळ वास्तव्य केल्याचे आणि महाभारताचे काही पर्व येथे लिहिल्याचे दंतकथा आहे प्राचीन काळात यावलच्या उत्तरेस असलेल्या सातपुड्याचे घनदाट जंगल  भुसावळच्या तापी नदीपात्रापर्यंत असल्याचे सांगितले जाते. सध्याच्या येथील हाडकाई-खडकाई नद्या म्हणजेच पूर्वीच्या हरिता – सरिता होत. या नद्यांच्या संगमानंतर सूर नदी ही दक्षिणवाहिनी आहे, शहराच्या बाहेर याच नदीच्या टेकडीवर लोमेश ऋषी राहत होते एकदा  लोमेशांनी महर्षीव्यासांच्या हातून यज्ञ करण्याचे ठरविले होते. त्याच वेळेस अज्ञातवासातून हस्तीनापुराकडे परतत असलेल्या पांडवांनी  लोमेशांचे आश्रमात काही काळ विसावा घेतला होता . परतीच्या प्रसंगी लोमेश  महर्षी ऋषीमनी पांडवांच्या हस्ते महर्षी व्यासांना यज्ञांचे निमंत्रण दिले होते. महर्षीव्यासांचे हस्ते यज्ञ पार पडल्यानंतर . महर्षींनी काही काळ या परिसरात घालवला अशी दंतकथा आहे. आणि महर्षींच्या वास्तव्य काळात महाभारताची काही पर्व येथे लिहिण्याचे सांगितले जाते.

 

महर्षी व्यास हे सप्त चिरंजीवां पैकी एक आहेत. चिरंजीवी महर्षी व्यासआजही या भूमीत वावरत असल्याचे परिसरातील  भाविकांची भावना आहे. महर्षीव्यासांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीतव्यासांचे भव्य मंदिर असल्याने दरवर्षी येथे गुरुपौर्णिमेस मोठ्या यात्रेयात्रेचे आयोजन केले जातें.महर्षीव्यासांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येथे येतात.

 

पौर्णिमेनिमित्ताने महापूजा

 

गुरु पौर्णिमेनिमित्ताने यावल येथीलमहर्षीव्यासमंदिरात सकाळी आठ वाजेला महापूजेचे आयोजन करण्यात आले असून ११ पासून महाप्रसाद वाटपास सुरुवात होईल.   दिवसभर महाप्रसादाचे वाटप सुरू राहणार आहे. भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनमहर्षीव्यासव श्रीराम मंदिर विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content