नाभिक बांधवांना आर्थिक मदत जाहीर करा : किशोर सूर्यवंशी यांची मागणी (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीने थैमान घातले असून या महामारीवर प्रतिबंध रोखण्यासाठी सरकारतर्फे कोरोनाला देण्यात येत आहे. नाभिक समाजाचा व्यवसाय सलुनचा असून आमच्या बांधवांचा संपर्क सर्व सामान्य जनतेची केस कर्तन तसेच दाढी करताना रोज येत असल्याने नाभिक समाज बांधवांना लस देण्यात यावी तसेच नाभिक समाजबांधवांना आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ राज्य संपर्क प्रमुख किशोर सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केली.   

मागील आठ महिन्यापासून नाभिक व्यासाय करणाऱ्या बांधवांना बिकट परिस्थिती ओढवली असून राज्यभरात २० समाजबांधवांनी आत्महत्या केली आहे. मात्र, शासनाने याची कुठेही दखल घेतली नसल्याचा आरोप देविदास फुलपगारे यांनी केला आहे. लॉकडाऊनची भीती पुन्हा उभी केली जात आहे. या कोरोना महामारीचा नाभिक बांधवांच्या व्यवसायावर वाईट परिणाम झाला असून गिऱ्हाईक देखील येणे कमी झाले आहेत. दरम्यान, लॉकडाऊन पुन्हा करण्यात आले तर अटी-शर्ती लागू करून नाभिक बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी श्री. फुलपगारे यांनी केली आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, श्री संत सेना नाभिक हितवर्धक संघ जळगाव शहर अध्यक्ष अरुण वसाणे, मनीष कुंवर, उदय पवार आदी उपस्थित होते.     

 

भाग १

https://www.facebook.com/508992935887325/videos/196928931856211

भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/303572794441844

Protected Content