जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी जिल्हास्तरीय शहरात प्रवेश बंदी करण्यात आली असतांना शहरात प्रवेश करणाऱ्या दोघांवर लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शासनाने कोरोना विषाणूची फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाबंदी असतांना शेख अनीस शेख चांद रा. शिवाजी नगर याने मागील पाच ते सहा दिवसांपासूनशेख अलतिया आसीफ पटेल रा. इस्लामपूरा विंचूर ता. निफाड जि. नाशिक या महिलेला कोरोना संदर्भात कोणत्याही शासकीय रूग्णालयात तपासणी न करता घरात घेतले. तसेच जळगाव शहरात आल्यावर त्याबाबतची माहिती महानगरपालिकेला कळविले नाही म्हणून पालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.