अथर्वशीर्षातून झाला बाप्पाचा जयघोष

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील डॉ.अविनाश आचार्य विद्यालयात “माझा गणेशोत्सवांतर्गत” शिक्षकानीं व विद्यार्थ्यांनी सामूहिक रित्या ऑनलाइन च्या माध्यमातून अथर्वशीर्ष म्हणत गणपती बाप्पाची आराधना केली.

डॉ.अविनाश आचार्य विद्यालयातील इ ४ थी च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र अथर्वशीर्ष म्हटले. सुरुवातीला विजय पाटील यांनी गणपती स्तोत्र म्हटले, त्या नंतर पूनम दहिभाते, वंदना सावदेकर, कविता पाटील, प्रमोद इसे, केतन वाघ, योगेश जोशी, सीमा जोशी, मीना मोहकर व .तुषार पुराणिक यांनी अथर्वशीर्ष म्हटले. शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी देखील उत्साहात व जोशात गणपती बाप्पाची आराधना केली.

Protected Content