लेवा उत्थान फाऊंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

भुसावळ प्रतिनिधी । येथील लेवा उत्थान फाऊंडेशनतर्फे हाडांच्या विविध विकारांच्या तपासणीसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शहरातील म्युनिसिपल हायस्कुलमध्ये लेवा उत्थान फाऊंडेशन, भुसावळच्या माध्यमातून हाडांच्या विविध समस्यांवर आधारित मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय नियमांच्या अधीन राहून, शिबिराच्या ठिकाणी मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करून, सोशल डिस्टन्सिंग पाळत प्रसन्न वातावरणात हे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.

 या शिबिरात तपासणीसाठी नाशिकमधील तज्ञ डॉ. ब्रिजभूषण महाजन हे खास करून उपस्थित होते. ते भुसावळमधील दिवंगत स्त्री-रोग तज्ञ डॉ.एस.एस.महाजन याचे चिरंजीव आहेत. सदर तपासणी शिबिराचे उदघाटन  सुहास गोपाळ चौधरी यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक बोधराज चौधरी आणि  महेश फालक यांची उपस्थिती लाभली. आरोग्य तपासणी शिबिरास परिसरातील नागरिकांचा व खास करून महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिरासाठी  प्रमोद धनगर यांचे अनमोल सहकार्य लाभले. 

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता लेवा उत्थान फाऊंडेशनचे अध्यक्ष विनीत हंबर्डीकर, संस्थेचे पदाधिकारी  सचिन भोळे व  योगेश पाटील तसेच गोलू अत्तरदे, उल्हास महाजन, प्रदीप चौधरी, नेहल लढे, दीपक चौधरी, निखिल धनगर, हर्षल वारके, योगेश परदेशी, अजित बोंडे आदींनी सहकार्य केले.

Protected Content