मस्कावद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बेंडाळे तर उपसरपंचपदी सपकाळे

सावदा ता.रावेर (प्रतिनिधी) । येथून जवळ असलेल्या मस्कावद खुर्द येथील सरपंचपदी कुंदन विजय बेंडाळे तर उपसरपंचपदी गिरधर महारू सपकाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यधनेश प्रितम पाटील,निकिता चंद्रकांत कोळंबे,सुरेखा मिलिंद कोळी,कल्पना राजू तायडे,वर्षा वैभव फालक याची उपस्थिती होती निवडणुक अधिकारी  व्ही एच महाजन व ग्रामसेविका छाया नेमाडे यांनी कामकाज पाहिले.

 

Protected Content