जळगावात बॅग लिप्टींगच्या करणाऱ्या चोरट्याला पोलीस कोठडी

जळगाव प्रतिनिधी । काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेतून २ लाख रूपये काढून पायी जात असलेल्या वृध्दांच्या हातातून पैश्यांची पिशवी लांबविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरटा राहूल उत्तम चौधरी (वय-२६) रा. मांडकी ता. भडगाव रामानंदनगर पोलीसांनी अटक केली होती. आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धनराज प्रेमराज पुरोहित (वय-६०) रा. शनीपेठ, जळगाव २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कामाच्या निमित्ताने काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बँकेत आले होते. बँकेतून दोन लाख रूपयांची रोकड काढली व घरी जाण्यासाठी ते दुचाकीजवळ जात असतांना मागून व पिशवीत रक्कम ठेवून पायी घरी जाण्यासाठी निघाले. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मागुन चोरटा राहुल चौधरी हा दुचाकीने मागून येवून पैश्यांची पिशवी हिसकविण्याचा प्रयत्न केला असता प्रसंगावधानाने धनराज पुरोहित यांनी हातातील पिशवी सोडली नाही. यात दोघांची झटापट झाली. या घटनेत धनराज पुरोहित यांच्या पायाला जखमा झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरीकांनी चोरटा राहूल चौधरी याला पकडले व बेदम मारहाण केली. व रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते.  संशयित आरोपी राहूल उत्तम चौधरी  यांच्याविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दिपक बिरारी करीत आहे. 

Protected Content