यावल तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री

यावल प्रतिनिधी । गुटख्यावर बंदी असतांना ही तालुक्यात सर्रासपणे विमल गुटख्याची विक्री होत आहे. खुलेआम विक्री होणाऱ्या गुटख्यावर अन्न व औषद्य प्रशासन विभागाने गुटखा विक्रीस कायमची बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यात सर्रासपणे मोठ्या प्रमाणावर विमल गुटख्याची विक्री करण्यात येत असल्याने अगदी सहज मिळत असलेल्या गुटख्याच्या आकर्षणामुळे महीलांसह अल्पवयीन मुल-मुली व विद्यार्थी ही बळी जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

या संदर्भात माहीती अशी गेल्या अनेक दिवसापासुन यावल तालुक्यातील फैजपुरसह सर्व गावात न्यायलयाने बंदी घातलेल्या मानवी जिवनाला घातक असणारा विमल गुटक्याची सर्वत्र खुलेआम विक्री करण्यात येत असुन , गावागावातील पानटपऱ्या किराणा दुकान व इतर सार्वजनिक ठीकाणी अगदी सहज मिळणाऱ्या गुटक्यामुळे अगदी अल्पवयीन शाळकरीमुले ही घातक अशा गुटक्याच्या आकर्षणाच्या आहारी जावुन गुटका खात असल्याचे अत्यंत धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे . दरम्यान यावल तालुक्यात शेजारच्या गुजरात आणी मध्यप्रदेश या परप्रांतातुन एसटी बस तसेच इतर वाहनांनी मोठया व प्रमाणावर चोरट्या मार्गाने गुटक्याची तस्करी करण्यात येत आहे. एका माहीतीनुसार यावल तालुक्यात एका महीन्यास सुमारे ३०ते ३५ लाखाचा गुटका विक्रीस जात असल्याची माहिती समोर आली असुन, दरम्यान ऐवढया मोठया प्रमाणावर विमल गुटक्याची सर्रासपणे सार्वजनिक कुठलीही रोखठोक न करता विक्री होत असतांना अन्न व औषद्य प्रशासन विभागाला याची माहीती नसावी, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही तर अन्न व औषद्य प्रशासन विभागाने निंद्र अवस्थेतेतुन बाहेर येवुन या परप्रांतातुन बेकायद्याशीर तस्करी करून विक्री होणाऱ्या गुटका विक्रीस कायमची बंदी घालावी अशी मागणी होत आहे.

Protected Content