वेगवेगळ्या अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष साळुंखे यांच्यासह दोघे जखमी

WhatsApp Image 2019 05 10 at 8.52.45 PM

यावल (प्रतिनिधी) तालुक्यात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. जखमीमध्ये जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष गेंदू साेळुंके रा. चिंचोली यांचा समावेश असून त्यांच्यासह सर्व जखमींवर यावल ग्रामिण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

 

शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावल – सातोद रस्त्यावर वळनाचा अंदाज न आल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली त्यात विनायक नन्नवरे (वय ३० रा. जळगाव) हा गंभीर जखमी झाला. त्यास तात्काळ यावल ग्रामिण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले. तसेच दुपारी तीन वाजेला यावलकडून ऐनपूर ता. रावेर येथे लग्न समारंभात जिल्हा परिषदेेचे माजी सदस्य सुभाष गेंदा सोळुंके (वय ६० रा. चिंचोली ता.यावल) व प्रशांत सुरेश सोनवणे (वय ३४ रा. चुंचाळे) हे दोघं दुचाकीव्दारे जात होते. दरम्यान सांगवी येथे पुलाजवळ अचानक पाण्याचे टँकर रस्त्यावर आल्याने त्यापासुन बचाव करतांना दुचाकी चालक प्रशांत सोनवणे हे दुचाकीसह थेट पुलाच्या खाली कोसळले. यात सुभाष सोळुंके यांच्या डोक्यास हाताला व पायाला जबर दुखापत झाली तर प्रशांत सोनवणे यांच्या पायाला व छातीला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर येथील ग्रामिण रूग्णालयात डॉ. संतोष सांगोळे, नेपाली भोळे, मंजुषा कोळेकर, संजय जेधे, पिंटू बागुल यांनी प्रथमोपचार केले व त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, सेनेचे शरद कोळी, संंतोष धोेबी, चिंचोलीचे उपचरपंच आकाश सोळुंके, पप्पु सोळुंके सह अनेकांनी रूग्णालय गाठले होते. दरम्यान, रूग्णालयात १०८ वाहन असून त्यावर डॉक्टर नसल्याने भुसावळ येथुन वाहन बोलवण्यात आले. त्यात अर्धातास जखमींना नेण्यास विलंब झाल्याने जखमींच्या नातलगांनी संताप व्यक्त केला.

Add Comment

Protected Content