दहिगाव संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर शांतता समितीची बैठक संपन्न

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहिगाव येथील फलक विटंबनानंतर दोन समुदायात तेढ निर्माण झाल्यामुळे लावण्यात आलेल्या संचारबंदी उठवायची का पुन्हा लावायची या विषयावर चर्चा करण्याबाबत शांतता कमिटीची महत्वपुर्ण बैठक र्वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.

यावल तालुक्याच्या दहिगाव येथे दोन दिवसापुर्वी गावातील कुंभारवाडा पारिसरात एका मिरवणुकीनंतर महापुरुषाच्या फलक विटंबना वरून दोन समुदायात तेढ निर्माण झाल्या प्रकरणी लावण्यात आलेल्या संचारबंदी उठवायची की शितिल करायची, का पुन्हा लावायची याबाबत विचार विनिमय करण्यासाठी दहिगाव येथे शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीच्या प्रमुख स्थानी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपुर विभागाचे पोलीस उपअधिक्षक अन्नपूर्णा सिंग, प्रांताधिकारी फैजपूर अर्पित चव्हाण, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावलचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्या उपस्थितीत दहिगाव पोलीस चौकीच्या आवारात संपन्न झालेल्या शांतता समितीची बैठक पार पडली.

बैठकीत संचारबंदी बाबत चर्चा करण्यात आली. या शिवाय सोशल मीडियावर वाईट दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होणारी व सामाजिक भावना दुखावणारी पोज टाकणाऱ्या तरुणांवर, नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे प्रकार आगामी काळात घडता कामा नये. कोणतीही मिरवणूक, उत्सव पोलीस प्रशासनाने निश्चित केलेले मार्ग व त्याच दिशेने काढण्यात येतील, याशिवाय गावात विक्री होणाऱ्या गावठी दारू व इतर अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अशा अनेक मार्गदर्शनपर विषयांवर कायदेविषयक सूचना अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांनी उपस्थित शांतता समिती सदस्यांना या वेळी दिल्या. सर्व सण आनंदाने साजरे करा, कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे येथे होऊ देणार नाही कोणाची काही तक्रार असली तर ११२ वरती कॉल करा असे आवाहन यावेळी अशोक नखाते यांनी केले.

सरपंच अजय अडकमोल, सुरेश देवराम पाटील, उपसरपंच देविदास पाटील, बाळकृष्ण पाटील, दिनकर फेगडे, रमेश महाजन, राजेश जगताप, एम आर.महाजन, अनिल बढे, पी. डी.चौधरी,चेतन महाजन, मयूर पाटील, विजय बाविस्कर, समाधान इंदाटे, जितू पाटील, विनोद अडकमोल, पुंडलिक पाटील, गुलाबराव चौधरी, दिलीप चौधरी, दीपक पाटील, ललित पाटील यांचे सह अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content