कौटुंबिक वादातून विवाहितेला मारहाण करत छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहारतील छत्रपती शिवाजी नगरातील खडके चाळ येथील माहेर आलेल्या विवाहितेला मुंबई येथे सासरी घरातील वादाच्या कारणावरून अंगावरील श्रीधन काढून मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शनिवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील खडके चाळ येथील माहेर असलेल्या दिप्ती राहूल निकम यांचा विवाह मुंबई येथील राहूल अशोक निकम यांच्याशी झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला घरातील वादातून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच विवाहितेच्या अंगावरील श्रीधन काढून घेतले. तसेच सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला.

हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. शनिवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता विवाहितेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती राहूल अशोक निकम, सासू आशा अशोक निकम, सासरे अशोक यादव निकम, नणंद स्मिता किरण घडंकूश, दीर सचिन अशोक निकम, चुलत दिरानी भारती मिलींद निकम. माम सासरे दिनेश सिताराम शिरसाठ सर्व रा. मुंबई यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे हे करीत आहे.

Protected Content