कोरपावलीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हुरमत तडवी बिनविरोध !

यावल प्रातिनिधी । तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण सदस्यांची संख्या अकरा असून एक उमेदवार बिनविरोध निवडून गेल्याने उर्वरित 10 सदस्यांसाठी 33 उमेदवारांनी चार प्रभागातून अर्ज दाखल केले आहेत. अर्ज न भरल्याने हुरमत सिकंदर तडवी यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.

कोरपावली गावात ३० वर्षाच्या इतिहासात पहिल्यादांच एक आदिवासी महिला बिनविरोध निवडून येत असल्याने आदीवासी तडवी समाजाने दाखलेली एकता व त्यास इतर समाज बांधवांनी दिलेले पाठबळ हे कोरपावली गावातील ग्रामपंचायत निवडणुकीला सर्वसमावेश कारभारी यंदाच्या निवडणुकीत निवडुन येवुन गावाच्या विकासाकडे आपले लक्ष केन्द्रीत करतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडुन व्यक्त करण्यात येत आहे. विजयी मार्गावर असलेल्या ग्रामपंचायत सदस्य हुरमत तडवी यांनी आपले समाज बांधव व संपूर्ण ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आहे. 

माधारची वेळ दि. ४ जानेवारी २०२१ रोजी होणार असून हुर्मत तडवी यांच्या अधिकृत विजयाचे देखील त्याच दिवसी जाहीर होण्याची शक्यता आहे. सरपंच पदाचे आरक्षण हे अजून लांबणीवर असल्याने  भविष्यात सरपंच पद हे अनु जमाती महिला राखीव निघाल्यास सरपंच पदाची माळ त्यांच्या गळयात पडून प्रथमच कोरपावली ग्रामपंचायतीला एक आदीवासी तरुण वर्गाला मान मिळेल व गावात एक नवीन राजकीय समीकरण तयार होताना दिसून येईल. या निवडणुकीत जवळपास सर्व प्रभागातुन महीला व तरुणांचा मोठा सहभाग हा प्रथमच दिसुन आल्याने तरूण वर्गाकडे जाणार असल्याने यंदाची ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

Protected Content