सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व जिल्हा महिला शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यात जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापक गटातून १५, उपक्रमशील महिला शिक्षक गटातून १५ व माध्यमिक उर्दू शाळा तसेच आश्रम शाळा गटातून १५ तसेच दहा विशेष पुरस्कार अन्य कृतिशील महिला शिक्षकांना जाहीर झाला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या पुरस्काराचे वितरण होणार आहेत.

याच्या अंतर्गत अमळनेर ः सुनीता पाटील, जळगाव ः मंदाकिनी पाटील, चोपडा ः राजश्री बाविस्कर, जामनेर ः (गोराडखेडा) बेबी जयकारे, धरणगाव ः वंदना पाटील, भुसावळ ः माधुरी पाटील, बोदवड ः रोहिणी पाटील, यावल ः संगीता मगर, मुक्ताईनगर ः शुभांगी वरुडकर व रावेर ः पुष्पलता पाटील; पाचोरा :चंद्रप्रभा सोनवणे, भडगाव : साधना पाटील, चाळीसगाव : चंद्रकला साळुंके, एरंडोल: नीता पाटील, पारोळा ः रेखा कोठावदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

यासोबत माध्यमिक व आश्रमशाळेतील उपक्रमशील शिक्षिका या वर्गवारीमध्ये सुखदा पाटील (गो. से. हायस्कूल पाचोरा), भारती देसले (भडगाव), माया खैरनार (चाळीसगाव), आरती पाटील (एरंडोल), वैशाली पाटील (पारोळा), रत्नमाला सोनवणे (अमळनेर), मनीषा सूर्यवंशी (जळगाव), मनीषा बोरसे (चोपडा), कौमुदिनी पाटील (जामनेर), वर्षा पाटील (धरणगाव), रेखा चौधरी (भुसावळ), संगीता सातव (बोदवड), मनीषा भटकर (यावल), आशा कोळी (मुक्ताईनगर), तेजल भिरुड (रावेर) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान, उपक्रमशील शिक्षिका गटातून- उज्ज्वला पाटील (भडगाव), सुचिता राजपूत (चाळीसगाव), राजश्री सपकाळे (एरंडोल), अलका चौधरी (पारोळा), सुनीता लोहारे (अमळनेर), शीतल महाजन (पाचोरा) कल्पना चौधरी (ममुराबाद), सुनीता पवार (चोपडा), रत्नप्रभा गोरे (जामनेर), अंजुम बानो देशपांडे (धरणगाव), ज्योती बेलसरे (भुसावळ), मनीषा कचोरे (बोदवड), भाग्यश्री बोरोले (यावल), शुभांगी वरुडकर (मुक्ताईनगर), सिंधू राठोड (रावेर) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर, विशेष पुरस्कारांमध्ये बखत्यारी कौसर बानो मो. अहेमदउल्लाह, सविता जोशी (चाळीसगाव), वैशाली घोंगडे (जामनेर), कल्पना पाटील (चाळीसगाव), नफरीन जबर पटेल (जामनेर), कांचन राणे (भुसावळ), मेनका चौधरी (रावेर), भारती बागड (पाचोरा), सैयद गाजाला(रावेर) संध्या बोरसे (चोपडा), मनिषा शिरसाठ (धरणगाव) यांचा समावेश आहे.

Protected Content