लिंबोळी वेचण्यातून मजुरांना मिळाला चांगला व्यवसाय

 

 

वरणगाव : प्रतिनिधी ।  लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्या वेचणीतून उत्पन्नाचा नवा समाधानकारक पर्याय मजुरांना मिळाला आहे

 

सध्या पाऊस नसल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत त्यामुळे मजुरांचे सर्वत्र हाल होत आहेत परंतु काही मजुरांनी लिंबाच्या झाडाच्या लिंबोळी वेचण्याच्या व्यवसाय सुरू केला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्या या रस्त्यावरती पडलेल्या असतात यांना वेचून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका कंपनीला विकले जातात ही कंपनी या मजूराकडून आठ रुपये किलो दराने खरेदी करत आहे एक मजूर दिवसाकाठी एक क्विंटल लिंबोळी गोळा करीत आहे या लिंबोळी व्यवसायातून मजुराला दिवसाकाठी सातशे ते आठशे रुपये उत्पादन मिळत आहे यामुळे मजुरांना चांगला आर्थिक लाभ होत आहे

 

Protected Content