डॉक्टरांच्या प्रत्यनांना लाभली देवाची साथ, तरुणाचे वाचले प्राण

जळगाव, प्रतिनिधी  । एका बत्‍तीस वर्षीय तरुणाला अत्यावस्थ अवस्थेत त्याचे नातेवाईक डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात घेऊन आले. रुग्णाला चालणेही शक्य नव्हते.  त्याला रक्‍ताच्या बाटल्या आणि सलाईनद्वारे औषधी देत उपचार सुरु झाले. डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना देवाची साथ लाभली आणि तरुणाचे प्राण वाचले. 

 

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी असलेले भुषण बोडके (वय ३२) हे गेल्या सहा महिन्यापासून कौटूंबिक कारणामुळे नैराश्येच्या गर्तेत अडकले होते. परिणामी दारुचे व्यसनही त्यांना जडले आणि जेवणाचीही शुद्ध राहिली नाही. या प्रकारामुळे भुषणला अशक्यतपणा आला. त्याला चालणेही अशक्य होवून गेले. शरिराची हालचाल बंद झाली. आवाजही निघत नव्हता.. अशा परिस्थीतीत बोडके कुटूंबिय भुषणला घेवून १७ जून रोजी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात घेऊन आले.  आपातकालीन कक्षात प्राथमिक उपचार करत त्याला मेडिसीन विभागात हलविण्यात आले. दरम्यान मेडिसीन तज्ञ डॉ. पाराजी बाचेवार ह्यांनी रुग्णाला पाहिल्यावर तात्काळ रक्‍ताच्या चाचण्या करणे आणि सलाईनद्वारे मेडिसीन देण्याचे रेसिडेंट डॉ.आदित्य नांदेडकरसह स्टाफला सांगितले. रक्‍ताच्या चाचण्या केल्या असत्या रुग्णाच्या शरिरात केवळ १ ग्रॅम रक्‍त होते.  ३० हजार पेशींची संख्या होती. त्यामुळे सर्वप्रथम त्याला त्या रात्री एक पिशवी रक्‍त देण्यात आले. मग काही वेळाने पुन्हा एक बॅग रक्‍त देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीला मानवेल असा अंदाज घेवून दर दिवसाला एक पिशवी रक्‍त देण्यात आले असून ७ ते ८ पिशव्या रक्‍त लावण्यात आले. त्या रात्री मेडिसीन विभागात मिळालेल्या उपचारामुळे रुग्ण आज ठणठणीत बरा झाला.  त्याला सुट्टी देण्यात आली. यावेळी मेडिसीन वार्डात डॉ. साक्षी देशमुख, डॉ. प्रशांत भोसले, डॉ. समृध्दा देशमुख, डॉ.  क्षितीज बिर्‍हाडे यांनी उपचार केले.

 

Protected Content