पाऊस नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

वरणगाव  : प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे पशुपालकांना जनावरे चारण्यासाठी रानोमाळ वणवण भटकंती करावी लागत आहे  

 सध्या पावसाने खूप मोठी दांडी मारले आहे त्यामुळे शेतकऱ्यावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे त्यातच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांवर  आता जनावरांच्या चाऱ्याचे मोठ्या प्रमाणात संकट ओढवले आहे पाऊस नसल्यामुळे गवतही शेतामध्ये उगवले नाही त्यामुळे बकऱ्या व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आहे पाऊस न पडल्यामुळे कुठेही गवत उगवले नाही त्यामुळे बकऱ्यांच्या चारासाठी पशुपालक यांना बकऱ्यांना घेऊन वणवण भटकावे लागत आहे

 

Protected Content