डॉ. नि. तू. पाटील यांनी वाढदिवसानिमित्ताने कोरोना रुग्ण व योद्धयांना दिली अनोखी भेट

भुसावळ,प्रतिनिधी । येथील डॉ. नि. तू. पाटील यांनी त्यांचा वाढदिवस रेल्वे हॉस्पिटलमध्ये कर्तव्यांवर असतांना कोरोनाग्रस्त रुग्णांना व कोरोना वार्डात सेवा देण्याऱ्या कोरोना योद्धयांना “श्री रामरक्षा” भेट देऊन साजरा केला.

डॉ. नि. तू. पाटील यांची पहिल्या टप्प्यात २७ जून रोजी रेल्वे हॉस्पिटल मधील कोरोना बाधित रुग्णांच्या वार्डात ड्युटी लागली होती. त्यांची २३ जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यात ड्युटी लागली आहे. याच दिवशी डॉ. नि. तू. पाटील यांचा वाढदिवस असतो. त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना बाधित रुग्णांना चालू असलेल्या वैद्यकीय उपचारासोबत त्या सर्वांचे मानसिक शक्ती वाढावी,त्यांचा आत्मविश्वास वाढवा, लवकर त्यांना ह्या आजारातून मुक्तता मिळावी म्हणून अध्यात्मिक उपचार ही सोबत असावा म्हणून “श्री रामरक्षा” भेट देण्यात आली. तसेच कोरोना वार्डामध्ये रुग्ण सेवा करणाऱ्या सर्व कोरोना योद्धा यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनापण “श्री रामरक्षा” भेट देण्यात आली. जवळपास १११ “श्री रामरक्षा” भेट देण्यात आले. आजवर भरपूर वाढदिवस साजरे झाले पण संपूर्ण आयुष्यभर संस्मरणीय राहील तो हाच वाढदिवस अशी भावना डॉ. नि. तू. पाटील यांनी व्यक्त केली.त्यांना आमदार संजय सावकारे यांनी पीपीइ किट उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहे.

Protected Content