लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; तरुण गंभीर जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समता नगर येथील पाणी पाऊच फक्ट्री जवळ आंनदा उर्फ नारायण श्रीकृष्ण जंजाळे या तरुणास किरकोळ वादातून डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संभाजी नगर रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या समतानगर येथे आनंद जंजाळे (वय 28) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. तो कलर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जवळच राहणारे मुकेश राजू सोनवणे, वय 21 व अजय राजू सोनवणे वय 22 हे दोघे भाऊ आनंदला मारहाण करत होते. आनंदची आई त्याठिकाणी भांडण आवरण्यासाठी आली असता मुकेश याने तुझा मुलगा मला सापडलेला मोबाईल हा किरणला देऊन टाक असे सांगत आहे. त्यामुळे माझ्यात व किरणमध्ये भांडण झाले हे भांडण तुमच्या मुलामुळे झाले, असून मी त्याला जीवे ठार करिन असे म्हणत मुकेश व अजय याने आंनद यास लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर मुकेश याने आनंदच्या डोक्यात मागील बाजूने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात आनंद हा गंभीर जखमी झाला. मुकेश व अजय यांनी आनंद व त्याच्या आईस देखील शिवीगाळ करीत धमकी दिली व ते तेथून निघून गेले. जखमी आनंदवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आनंद याची आई लताबाई जंजाळे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.

 

Protected Content