पाचोरा न्यायालयातर्फे संविधान दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांचे आदेशाने पाचोरा तालुका विधी सेवा समिती, वकिल संघ पाचोरा यांचे संयुक्त विदयमाने “संविधान दिवस” निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला.

यावेळी मंचावर तालुका विधी सेवा समिती, अध्यक्ष तथा न्यायीक अधिकारी दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती एम. जी. हिवराळे, २ रे सह न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील उपस्थित होते. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी प्रास्तविक केले.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिक्षांत संजय दाभाडे, द्वितीय पारितोषिक श्वेता अनिल वाघ, तृतीय पारितोषिक राधिका संदीप पाटील यांनी प्राप्त केले. इतर विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाला अॅड. एस. बी. माहेश्वरी, अॅड. अनुराग काटकर, अॅड. रनसिंग राजपूत, अॅड.अविनाश सुतार, अॅड. के. एम. सोनवणे, अॅड. स्वप्नील पाटील, अॅड. अनिल पाटील, अँड लक्ष्मीकांत परदेशी, अॅड. नरेंद्र डकोरकर, अॅड. किशोर पाटील, अॅड. प्रशांत भावसार, अॅड. प्रशांत नागणे, अॅड. निलेश पाटील, अॅड. वसीम बागवान, अॅड. सुकेशीनी मोरे, अॅड. माधुरी जाधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समितीचे सहाय्यक दिपक तायडे, वकील संघ यांनी परिश्रम घेतले.

Protected Content