भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीतील ‘त्या’ बोर्डवर फेकला काळा रंग

 

अहमदनगर, वृत्तसंस्था । साई संस्थानने ड्रेसकोड बद्दल लावलेल्या वादग्रस्त बोर्डवर गुरुवारी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी काळा रंग फेकून घोषणाबाजी केली.

शिर्डी संस्थानाच्या माध्यमातून भक्तांनी भारतीय वेशभूषेत यावे, असे बोर्ड मंदिर प्रवेशद्वारावर लावले होते. अशा पद्धतीचा बोर्ड लावणे म्हणजे संविधानाने दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार आहे, असे सांगत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी विरोध केला होता. तसेच साई संस्थांनला हा बोर्ड काढून टाकावा, म्हणून पत्र पाठवले होते. परंतु संस्थानाच्या वतीने हा बोर्ड काढण्यात आला नव्हता. तृप्ती देसाई या स्वतः हा बोर्ड काढण्यासाठी शिर्डी येथे डिसेंबर महिन्यात येत होत्या. मात्र नगर जिल्ह्यात प्रवेश करताच सुपा येथे त्यांना अडविण्यात आले होते. त्यावेळी ३१ डिसेंबर पर्यंत संस्थांनी बोर्ड काढावा ,अन्यथा आम्ही पुन्हा येउन तो बोर्ड काढू, असा इशारा देसाई यांनी दिला होता. मात्र संस्थानने ड्रेस कोडबाबत लावलेला बोर्ड काढला नाही.

Protected Content