कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात ; एक जागीच ठार

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा-भडगाव रस्त्यालगत असलेल्या अंकिता कॉटनजवळ भडगावकडे जाणाऱ्या कारचे अचानक टायर फुटल्याने गाडी डाव्या बाजुने उजव्या बाजुस भरधाव वेगाने फिरल्यामुळे पाचोऱ्याकडे जणाऱ्या आयसरला कारची जोरदार धडक बसली. या धडकेत एकाचा जागीच मृत्यु तर कार चालक गंभीर जखमी झाला आहे.

सुत्रांनाकडून मिळलेल्या महितीनुसार, पाचोरा-भडगाव रस्त्यालगत असलेल्या अंकिता कॉटनजवळ पाचोऱ्याकडुन भडगावकडे जाणाऱ्या इंडीगो (सीएस) एम. एच. – ०३ ए. एफ. – २४००  या कारचे टायर फुटल्याने गाडी डाव्या बाजुने उजव्या बाजुस भरधाव वेगाने फिरली. व भडगाव कडुन पाचोऱ्याकडे येणाऱ्या आयसर (क्रं. एम. एच. ०४ जे. के. ८१८२) ची कारला जोरदार धडक बसल्याने या अपघातात इंडीगो कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कार चालक जिग्नेश छबूलाल पाटील वय – ३० (रा. भुवणे ता. धरणगाव) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मुत्यू झाला. अपघाताची माहिती पाचोरा पोलिसांना मिळताच घटनास्थळी काॅन्स्टेबल किरण पाटील यांनी धाव घेवुन अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजुला घेत जिग्नेश यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. सदर घटने बाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अपघातातील दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल हंसराज मोरे व अजय मालचे करीत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.