सुरभि मंडळाचे 22व्या वर्षात पदार्पण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळ” बहुउद्देशानी स्थापित झालेलं आपलं सुरभि मंडळ काही जाणकार आणि जेष्ठ अनुभवी महिलांच्या पुढाकारने 2001 साली सुरभिची रजिस्टर संस्था म्हणून स्थापना झाली. गणेश कॉलनी परिसरात ब्राह्मण महिला मंडळाची स्थापना होणं हे ब्राह्मण समाजातील महिलांसाठी निश्चितच आनंदाची बाब होती. महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा, व्यासपीठ मिळावं हा मुख्य उद्देश त्या मागे होता. सामाज सेवा ही घडावी, महिला जाणत्या, जागृत व्हाव्यात म्हणून हा वृक्ष लावण्यात आला आणि आज त्याचा वटवृक्ष झालाय “सुरभि कला गुणेन वर्धते” हे मंडळाचे आदर्श 21वर्ष लोटली अनेक सभासद झालेत आणि होतायेत, सुरभिच्या माध्यमातून महिला एकत्रित होऊन अनेक दर्जेदार कार्यक्रमांचा आस्वाद घेतायेत. सुरभि मंडळाचे 22व्या वर्षात पदार्पण होत असून यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अन्नदान करण्यात आले.

मंडळाच्या कारकिर्दीतमाधुरी फडके, विशाखा गर्गे, चारुता गोखले आणि आत्ताच्या विद्यमान अध्यक्ष स्वाती कुलकर्णी ह्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. मंडळात संक्रांत हळदीकुंकू, महिला दिन, पावसाळी सहल, सभासद पाल्य गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि त्या सोबत त्यांच्या मातांचा सत्कार, चैत्रागौर हळदीकुंकू, सुरभि भावगीत स्पर्धा आणि ह्यातून संगीताचे व्यासपीठ तसंच महिला आणि लहान वयोगटातील मुलींना दिला जाणारा “स्वरश्री चषक”, भरीत पार्टी आणि प्रत्येक वर्धापन दिनी सामाजिक उपक्रम घेतला जातो. हे मुख्य कार्यक्रम राबवत असतांना त्या अंतर्गत अनेक उप कार्यक्रम राबवले जातात. हयात महिलांचे आरोग्य शिबीर, यांच्या विविध तपासण्या तसेच आरोग्य जागर, विविध स्पर्धा, संक्रांत हळदीकुंकू आणि ह्या निमित्ताने दिला जाणारा “उत्कृष्ट सभासद पुरस्कार”, कोजागरी उत्सव चर्चा सत्र, संगीताचे कार्यक्रम, विविध क्षेत्रातील महिलांचे सत्कार ही केले गेले. सत्कारार्थी महिलात परिचारिका ते स्वयंपाक करणाऱ्या अन्नपूर्णा चा ह्यात समावेश होता.सुरभिचा “सुरभि सुगरण रेसिपी ग्रुप देखिल आहे. तसंच पाककला, सोडा डिटर्जंट, फुलं बनवणे असे उपक्रम महिलांसाठी घेतलेत.सामाजिक तेचं भान जपण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे गोरगरीबांना अन्नदान, किंवा पूरग्रस्तांना मदत असो किंवा अनाथ मुलांना केलेली मदत असो, निरीक्षण गृहातील महिला किंवा रिमांड होम मधील, लिलाई बालकांश्रमातील एखादा उपक्रम असो… ह्यात मंडळ आपली भूमिका बजावत असते. ह्या व्यतिरिक्त सभासदांच्या घरात कुणी व्यक्ती स्वर्गवासी झाल्यास त्यांना पहिल्या दिवशी भोजन देऊन त्यांच्या दुःखात सहभागी मंडळ होते, तसंच समाजातील एखादी व्यक्ती आजारी असेल आणि उपचारासाठी तिला गरज असेल अश्यावेळी त्या व्यक्तीलाही दिलेली मोलाची मदत किंवा सुधर्मा ह्या संस्थेतील गरजू मुलांना केलेली शालेय वह्याची किंवा जुनी सायकल देऊन केलेली मदत ह्यात सेवाभावच जपण्याचा प्रयत्न असतो, वर्धापन दिनानिम्मित एखाद्या सामाजिक संस्थेला भेट देऊन त्यांची कार्यप्रणाली समजून घेऊन त्याही संस्थेला फुल ना फुलाची पाकळी देऊन त्यांनाही आम्ही तुमच्या सोबत खारीचा वाटा उचलत आहोत ही भावना असते.

मुख्य म्हणजे दैनंदिन धाकाधाकिच्या जीवनात सोशल मिडीयचा सुयोग्य उपयोग करून ब्राह्मण समाजातील वधू वरांसाठी “सुरभि वधुवर संकलन ग्रुप “मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष सौ. स्वाती कुलकर्णी ह्यांनी पुढाकार घेऊन सुरु केलाय. अत्यंत उत्तम प्रतिसाद ह्यला लाभला असून अनेकांना ह्याचा उपयोग झालाय. अनेक विवाह ह्या माध्यमातून जुळून आले आहेत. तसंच मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम अनेक घेतले आहेत मग नवरसावर आधारित कार्यक्रम असो किंवा स्त्री भ्रूण हत्या विरोधी पोवाडा असो किंवा “या देवी सर्व भुतेशू “ही नाटिका, आकाशवाणी जळगाव केंद्रावर महिलमंडळची मुलाखत आणि एफ एम वर मंडळाच्या अध्यक्ष सौ स्वाती कुलकर्णी ह्यांची घेतलेली मुलाखत किंवा यंदा सभासदांतील कर्तृत्व वान महिलांचा गुणगौरव म्हणून “कर्मस्वामिनी “म्हणून त्यांना दिला जाणारा सन्मान असो ह्याची दखल वृत्तपत्र किंवा समजमध्यम घेतात आणि मंडळाच्या कार्याची दखल घेतली जाते तेव्हा ती मंडळासाठीअभिमानाची बाब असते. तसेच महिला म्हटल्या की धार्मिकतेची बैठक आली. व्रत वैकल्य आणि परंपरा जपणे आपलं कर्तव्य आहे म्हणून “भक्तीदीपिका “नावाचे पुस्तक मंडळाकडून प्रकाशित करण्यात आलं आहे. त्याच्या तीन आवृत्या सुद्धा निघाल्या आहेत अत्यंत भरगोस प्रतिसाद ह्या पुस्तकाला मिळत आहे. संकल्पसहित पुजाविधी विविध स्तोत्र ह्यात असून किंमत 75रु. आहे. नुकताच गजानन महाराज पारायणाला देखिल सुरवात झालीये. नाममात्र जमा देणगी शुल्क शेगावला महाराजच्या चरणी अर्पण होणार आहे.

नवरात्री उत्सव म्हणजे महिलांच्या मनाच्या जवळचा असा उत्सव, स्त्री शक्तीचं पूजन म्हणून नऊ दिवस “श्री सुक्त” आवर्तन घरोघरी जाऊन केलं जाते नंतर भंडारा ही केला जातो. गणपतीच्या दिवसात अथर्वशीर्ष पठण होते, ह्या वेळी जी देणगी जमा होते तिचा सुयोग्य ठिकाणी म्हणजे सामाजिक कार्यासाठीच वापर होतो.ह्या वेळी सभासदांना खूप उत्साह असतो वातावरण भक्तिमय असते. श्रावणात मंगळा गौरीचे खेळ ग्रुप आहे ज्यात अनेक खेळ असतात, हे खेळण्यासाठी आणि दृश्य स्वरूपात बघण्यासाठी खूप आनंदायी असतात असा ग्रुप आपल्या महिला मंडळाचा आहे, सभासद आणि बाहेरगावी ह्या ग्रुपला मागणी असते. डोहाळजेवणाची गितेआणि खेळ ही ग्रुपतर्फे सादर केली जातात. स्रियांच्या सर्वांगीण विकास, मानसिक आणि बौद्धिक उन्नती होईल असेच उपक्रम मंडळ सातत्याने राबवित असते. आनंदाची देवाण घेवाण व्हावी आणि घरातील कामातून व्यापातून तिला स्वतःचा असा वेळ मिळावा म्हणून मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकारणी नेहमी प्रयत्नशील असते. विद्यमान कार्यकारणीत अध्यक्ष स्वाती कुलकर्णी, उपाध्यक्ष सौ. रेवती शेंदुर्णीकर, सचिव मंजुषा राव, सह सचिव सुनिता सातपुते, कोषाध्यक्ष विनया भावे, सह कोषाध्यक्ष साधना दामले, प्रसिद्धी प्रमुख सौ. वैदेही नाखरे आणि अश्विनीअ.जोशी, अश्विनी च जोशी, ज्योती भोकरडॊळे, मेघा नाईक, नीलिमा नाईक, सविता नाईक, डॉ. विशाखा गर्गे, सौ. वैशाली कुलकर्णी, संजीवनी नांदेडकर, आणि माधुरी फडके ह्या कार्यरत आहेत.

मंडळ एक संघटन आहे ह्यात सभासद संख्या 125 आहे आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे ह्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी सतत प्रयत्न शील असतात आणि त्यांना साथ असते ती कृतिशील कार्यकारणी सदस्यांची आणि सभासदांची. अनेक दानशूर देणगीदार सभासद निस्पृह देणग्या मंडळास देऊन हातभार लावत असतात. अनेक जेष्ठ सदस्य मार्गदर्शन करतात आणि म्हणूनच आज मंडळ 21व्या सोनरी वर्षात पदार्पण करत आहे. अनेक ज्ञात अज्ञातांचे स्मरण आज करायचं आहे ज्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा मंडळसोबत आहेत. असंच मंडळाची कारकीर्द सर्वांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने बहरेल ह्यात शंका नाही.

 

 

 

Protected Content