कानळदा रोडवर महावितरण कंपनीच्या तारांची चोरी; तालुक्याला गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा रोडवरील महावितरण कंपनीच्या २५ हजार रूपये किंमतीच्या अल्यूमिनीअमच्या तारांची चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कानळदा आणि फुफनगरी रोडवरील मनोहर आनंदराव जाधव यांच्या शेतातून महावितरण कंपनीचे इलक्ट्रिक वस्तू ठेवण्याचे गोडावून आहेत. २८ डिसेंबर २०२० ते ३० डिसेंबर २०२० च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीचे अल्यूमिनीअमच्या तारांची चोरी केल्याचे उघडकीस आले. सुरूवातीला दोन दिवस तार कोणी नेले आहे का याची विचारणा केली परंतू कोणत्या कर्मचाऱ्याने विचारल्याशिवाय नेले नसल्याचे समोर आल्याने तारांची चोरी झाल्याचे लक्षात आले. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात कनिष्ठ अभियंता राघवेद शंकर कापसे (वय-२७) रा. भादली यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल तायडे करीत आहे.

Protected Content